जळगाव मिरर | ७ जुलै २०२५
गोवंशाची कत्तल करुन मांस विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्यांवर शनिपेठ पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईमध्ये ५० किलो गोमांससह कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण १० हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास शहरातील ईस्लामपुरा भागात केली. याप्रकरणी सादिक साबीर शेख (वय २८, रा. ईस्लामपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील ईस्लामपुरा भागातील एका घरात बेकायदेशीररित्या गोमांसची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी, पोहेकॉ शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, विजय खैरे, विकी इंगळे, रविंद्र तायडे, काजल सोनवणे यांचे पथक तयार करुन कारवाई साठी रवाना केले. हे पथक चौबे शाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका दुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहचले.
पोलिसांनी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्यांना आवाज दिला. त्यांना घराची झडती घेण्याबाबत सांगितल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेण्यास सुरुवात केली. तपासणीवेळी पोलिसांना दोन प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये गोमांसह व इतर अवशेष जमिनीवर पडलेला दिसून आले. तसेच वजनकाट आणि गोवंशाची कत्तल करण्यासाठी कोयता देखील मिळून आला. पोलिसांनी लागलीच मासांची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश चोपडे हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी काही मांस तपासणीसाठी घेवून गेले. तर उर्वरीत मांस पोलिसांनी जप्त करुन ते पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित सादीक साबीर शेख (वय २८, रा. ईस्लामपुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
