जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच कल्याण स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दि.९ डिसेंबर शनिवारी रोजी एका व्यक्तीसोबत ज्योती तोरडमल लॉजमध्ये आली होती. या महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या लॉजच्या एका रूममध्ये एक महिला दि.९ डिसेंबर शनिवार रोजी भूपेंद्र गिरी नावाच्या एका इसमासोबत ज्योती तोरडमल महिला आली होती. आज रविवार,९ डिसेंबर) सकाळी बराच वेळ झाला मात्र दरवाजा उघडत नसल्याने लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा या महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ महात्मा फुले पोलिसांना याबाबत माहिती दिली. महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. ज्योतीच्या सोबत आलेला भूपेंद्र गिरी हा पसार झाला.
दरम्यान, ज्योतीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे .महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील,पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फरार युवकाच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथके रवाना झालेत. भूपेंद्र ताब्यात आल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.