जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२३
देशातील अनेक ठिकाणी वन विभागाच्या जवळपास गावात वाघांचा शिरकाव होत असल्याचे दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. चंपावत जिल्ह्यातील बून वन क्षेत्रात आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी दोन महिलांनी चक्क वाघाशी दोन हात केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी गीता (वय ३६), जानकी देवी(वय ३६), पार्वती देवी (वय ३७) जंगलात गेल्या होता. तेव्हा अचानक वाघाने गीतावर हल्ला केला. तिला वाचवण्यासाठी दोन मैत्रिणीने वाघाशी झुंज दिली.
यासंबंधित बून फॉरेस्ट रेंजर गुलजार हुसेन यांनी सांगितले की, वाघाने गीतावर हल्ला केला आणि जंगलात नेले. वाघाने गीताला सुमारे ४० मीटर खेचत नेले. यावेळी मैत्रिणीवर होणारा हल्ला पाहून जानकी आणि पार्वतीने काठ्या आणि विळा घेऊन वाघावर हल्ला केला. त्यानंतर वाघावर दगडफेक केली. खूप प्रयत्न करुन अखेर वाघ जंगलात निघून गेला. या सर्व घटनेत गीता गंभीर जखमी झाली आहे. गीताला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव होत होता. ती बेशुद्ध झाली होती. त्यानंतर तिला टनकपूर येथून रुग्णालयात नेण्यात आले. उपाचार घेतल्यावर तिच्यावरील धोका टळला आहे, असे सांगण्यात आले आहे.
गीता देवी सध्या रुग्णालयात आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारण होत आहे. याबाबत डॉ. मोहम्मद आफताब आलम यांनी सांगितले की, गीताच्या डोक्याला दुखापत झाली असून २४ टाके पडले आहेत. ती सध्या सुखरुप असून तिला उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले आहेत. याप्रकरणी गीताच्या मैत्रिणी जानकी आणि पार्वती यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बून फॉरेस्ट रेंजर गुलजार हुसेन यांनी जानकी आणि पार्वती यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून गावकऱ्यांना काही दिवस जंगलात न जाण्याचा सल्ला दिला आहे.