• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शिंदेसेनेचा ठराव : उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 14, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
शिंदेसेनेचा ठराव : उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२५

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आले असून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. तर आता सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांच्या आणि उपनेत्यांच्या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशा मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला. शिंदेसेनेचे नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी करणार आहेत, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली.

नोव्हेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोअर टीममधील विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली होती. त्या वेळी मोठा वाद उद‌्भवला होता. त्यावर भाजपने सारवासारव करत भाजपची अशी कुठलीही मागणी नसल्याचे फडणवीस यांनी सांगून वादावर पडदा टाकला होता. आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेने उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केल्याने हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

भाजपच्या प्रदेश अधिवेशनात शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल फुंकण्यात आले. त्यापाठोपाठ शिंदेसेनाही सक्रिय झाली आहे. वांद्रे (पश्चिम) येथील रंगशारदा सभागृहात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक झाली. त्यात २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी बीकेसीमध्ये महत्त्वाची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य सत्कार केला जाईल. तसेच स्थानिक निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा केली जाईल. शिंदेसेना २४ ते २९ जानेवारीदरम्यान सदस्यता मोहीम राबवणार आहे. दरम्यान, मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्यास शिंदेसेना अनुकूल आहे. तसेच मुंबईतील सर्व शाखाप्रमुख आणि पदे रिक्त करून नवीन नियुक्त्या करण्यावरही एकमत झाले. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

१७ नोव्हेंबर २०१२ ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यानंतर २०१४ मध्ये फडणवीस सरकार आल्यावर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारणीसाठी समिती गठित करण्याचा जीआर काढण्यात आला. सप्टेंबर २०१६ मध्ये फडणवीस सरकारने स्मारकासाठी विश्वस्त मंडळास मान्यता दिली. स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांची सदस्य सचिव म्हणून, तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय पूनम महाजन आणि स्मारकाचे आर्किटेक्ट शशिकांत प्रभू यांचाही सदस्य म्हणून समावेश आहे. ही नियुक्ती ५ वर्षांसाठी होती.

Related Posts

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !
क्राईम

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !
क्राईम

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

‘पैसे का नाही दिले?’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

July 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
जळगाव

जळगावात खळबळ : शेअर मार्केटच्या आमिषाने कापड व्यावसायिकाला ९.३५ लाखांचा गंडा!

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group