जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३
क्षितिज फाउंडेशनतर्फे स्वामी विवेकानंद नगर मधील टार्गेट अभ्यासिका येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, राजे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस दिपाली काटकर व किर्ती कोळी यांच्या हस्ते माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले.
यावेळी क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष तथा टार्गेट अभ्यासिकेचे संचालक गजानन वंजारी, निलेश गारुंगे, सागर गरुड, मोहित जोशी, कपिल गारुंगे, सचिन ब्राम्हंडे, सुमित वाघ, मनोजकुमार पाटील उपस्थित होते.