जळगाव मिरर / ११ मार्च २०२३ ।
जळगाव जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीत बंडखोर उमेदवार संजय पवार विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यावर संजय पवार विजयी झाले आहे. संजय पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडे उमेदवारी मागितली होती. पण नंतर त्यांनी बंडखोरी केली.
निवडणुकीवेळी शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गटाच्या एका सदस्याने त्यांना पाठिंबा दिल्याने संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अमोल चिमणराव पाटील शिंदे गट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
एक महिन्यापूर्वी बॅंकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच, श्यामकांत सोनवणे यांनी देखील उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली.