• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 29, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | २९ सप्टेंबर २०२६

आईची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सांभाळ करण्यासाठी नातेवाईकांकडे ठेवण्यात आलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या संमतीशिवाय प्रौढ तरुणासोबत घरातच लग्न लावून दिल्याचा गंभीर प्रकार पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथे समोर आला आहे. लग्नानंतर अल्पवयीन मुलीला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप असून, दि. २८ सप्टेंबरपासून तिचा पती तिला सोबत घेऊन कुठेतरी निघून गेल्याची तक्रार तिच्या मोठ्या बहिणीने पाचोरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

तक्रारीनुसार, पीडित मुलगी ही १४ वर्षे १९ दिवस हिचा सांभाळ करण्यासाठी तिची आजी सुगंधाबाई पुंजाजी गावंडे (रा. कासली, ता. जामनेर) यांच्याकडे ठेवण्यात आले होते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी तिची आई आशा संभाजी भोसले हिने तिला आजीकडून घेऊन पुनगाव येथील रविंद्र पाटील यांच्या घरी सांभाळ करण्यासाठी ठेवले होते.

दरम्यान, दि. १७ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलगी ही तिच्या बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त तितूर-सोयगाव येथे आली होती. त्यावेळी तिच्या निदर्शनास आले आपल्या अल्पवयीन बहिणीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसून आले. याबाबत विचारणा केली असता, पुनगाव येथील रविंद्र पाटील यांच्या मुलगा योगेश रविंद्र पाटील (वय सुमारे २८ वर्षे) याच्यासोबत सुमारे चार महिन्यांपूर्वी घरातच लग्न लावून दिल्याचे सांगितले असे तक्रारीत नमूद आहे.

तसेच लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचे त्या अल्पवयीन मुलीने सांगितल्याचा आरोप आहे. मुलबाळ होण्यासाठी आपल्यावर विविध प्रकारचे दोरे-धागे करण्यात येत असल्याचेही तिने बहिणीला सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर दि. १८ सप्टेंबर रोजी मोठी बहिण व तिच्या पतीने त्या अल्पवयीन मुलीला पुनगाव येथे तिच्या सासरी सोडले.

दरम्यान, दि. २८ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीचा पती योगेश याचा फोन बंद येत असल्याने तिच्या आईने मोठ्या जावयाला पुनगाव येथे जाऊन पाहणी करण्यास सांगितले. तो तेथे गेला असता अल्पवयीन मुलगी व तीचा पती योगेश दोघेही घरी आढळून आले नाहीत. घरातील अल्पवयीन मुलीच्या सासुने सांगितले योगेशच्या आजीची तब्येत खराब असल्याने ते तेथे गेल्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा पूनम दीपक खैरनार, मीना प्रकाश बोरसे व शारदा तायडे यांनी अल्पवयीन मुलगी संदर्भात तिची आई आशा संभाजी भोसले यांनी तक्रार केल्याची माहिती तिच्या मोठ्या बहिणीला दिली. तसेच या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिल्यानंतर संबंधित महिलेने पती राहुल भगवान मोरे यांच्यासोबत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही योगेश रविंद्र पाटील याच्यासोबत लग्न लावून दिल्याचा आरोप रविंद्र पाटील व त्यांच्या परिवारातील व्यक्तींवर करण्यात आला आहे. तसेच दि. २८ सप्टेंबरपासून योगेश हा त्यांच्या अल्पवयीन पत्नीला सोबत घेऊन कुठेतरी निघून गेल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी योगेश रविंद्र पाटील (रा. पुनगाव, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून,पाचोरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. याबाबत प्रारंभिक महिला अपराध समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा पूनम दीपक खैरनार यांचे सहकार्य लाभले.

Related Posts

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू
क्राईम

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मुक्ताईनगरात खळबळ : घराच्या बांधकामस्थळी सहा वर्षीय मुलीवर अत्याचार, एकावर गुन्हा दाखल !

September 29, 2026
महिलेला मारहाण ; अदखलपात्र गुन्हा दाखल
क्राईम

पैशांसाठी मद्यपी पतीचा पत्नीला मारहाण; ‘ट्रेनमधून फेकून देईन, गोळी मारेन’ अशी धमकी!

September 29, 2026
जामनेर तालुक्यात खळबळ : अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मीनलचा दुर्दैवी अंत!
क्राईम

जामनेर तालुक्यात खळबळ : अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मीनलचा दुर्दैवी अंत!

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group