
जळगाव मिरर | २२ मे २०२६
रायसोनी नगर भागात घरफोडीची घटना १८ मे रोजी समोर आली आहे. महावितरणमध्ये कार्यरत असलेले पंकज सुरेश भावसार (वय ४१) हे कुटुंबीयांसह नातेवाइकांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी परगावी गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोने- चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
पंकज भावसार हे आपल्या कुटुंबीयांसह १५ ते १८ मे दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे एका नातेवाइकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर सलग तीन दिवस बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील कपाटातून ४० हजार रुपयांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पंकज भावसार हे आपल्या कुटुंबीयांसह १५ ते १८ मे दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे एका नातेवाइकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर सलग तीन दिवस बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील कपाटातून ४० हजार रुपयांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.





















