पाचोरा : प्रतिनीधी
शहरातील सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी विरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पाचोरामधील एका भागात सहा वर्षीय चिमुकली आपल्या परिवारासह राहते. त्याच परिसरात समोर राहणारा ३० वर्षीय तरुणाने विनयभंग केला. सहा वर्षाची चिमुकली तरुणाच्या घरी खेळण्यासाठी गेली असता तिला लज्जा उत्पन्न हाईल, असे कृत्य करून त्याने बालिकेचा विनयभंग केला. आपल्या सोबत घडलेला प्रकार पिडीत मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर पिडीत मुलीसह कुटुंबियांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादवरून पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलीसांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.