जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२३
शरद पवार गटाचे नेते सध्या भाजप व शिंदेंच्या सेनेवर जोरदार आरोप प्रत्यारोप करीत असतांना आता खा.सुप्रिया सुळे यांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे.
भारतीय जनता पक्षाकडे कोणी टॅलेंट नाहीये म्हणून, त्यांना बाहेरून माणसं घ्यावी लागतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गट आणि भाजपमध्ये नवा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आसामच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मला अत्यंत आनंद होतो. कारण आसामच्या संपूर्ण भागात त्यांचा कंट्रोल आहे. त्यांची आणि आमची भेट झाल्यावर मी त्यांना नेहमी थम्स अप करते. कारण ते मूळ काँग्रेस पक्षाचे आहेत. आसाममध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं केलं असलं तरी ते मूळ काँग्रेस पक्षाचे आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये कोणी टॅलेंट नाहीये म्हणून त्यांना बाहेरून माणसं घ्यावी लागतात. त्या माणसांच्या माध्यमातून आपले विचार तिकडे जातात आणि हे अत्यंत चांगलं आहे.”