
जळगाव मिरर | २२ मार्च २०२५
जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सुपडू पाटील यांनी आज दि.२२ रोजी टोकाचा निर्णय घेत राहत्या घरात गळफास घेवून आयुष्य संपविल्याची घटना पहाटे उघडकीस आली आहे. परिवारातील सदस्यांसह नागरिकांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रभाग क्र.१ मधील सामाजिक कार्यकर्ते व राधाकृष्ण नगर परिसरातील रहिवासी प्रफुल्ल सुपडू पाटील (वय ४० अंदाजे) हे पत्नी, मुलांसह रहिवासास असून दि.२१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली तर सकाळी परिवारातील सदस्य उठले असतांना त्यांना पहाटे प्रफुल्ल पाटील यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने त्यांनी एकच आक्रोश केला होता.
दि.२२ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता. सीएमओ.डॉ.निरंजन देशमुख यांनी त्यांना मयत घोषित केले. प्रफुल्ल पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार होता. तर त्यांची अंत्ययात्रा आज दि.२२ मार्च २०२५ शनिवार दुपारी १ वाजता राहत्या घरून निघणार आहे. प्रफुल्ल पाटील हे गेल्या २० वर्षापासून प्रभाग क्र.१ परिसरात समाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. ते नेहमीच नागरिकांच्या सुख दुखात धावून येत असत. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने परिसरात मोठा शोक व्यक्त होत आहे. सध्या ते माजी नगरसेवक दिलीप पोकळे यांच्या सोबत काम करीत होते.