
जळगाव मिरर | २१ मे २०२६
शेतातील मशागतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मधुकर पंडित बडगुजर (वय ६५, रा. फुपनगरी, ता. जळगाव) यांच्या सायकलला भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वद्धाचा जागीच मृत्यू झत्तल्याची घटना दि. १९ मे रोजी कानळदा ते फुपनगरी रस्त्यावर घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात वाहनचालक अचलाराम सुजाराम चौधरी (वय ४२, रा. किनोद, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील फुपनगरी येथील मधुकर बडगुजर हे त्यांच्या कुटुंबियांसह शेतात गेले होता त्यांनी शेतातीलमशागतीचे काम आटोपले व त्यांचा मुलगा सुनील बडगुजर हे दोघ घरी जाण्याकरीता निघाले. त्या पाठोपाठ मधुकर बडगुजर हेदेखील सायकलने घरी जात असतांना शेतातून रस्त्यावर लागताच कानळदाकडून जळगावकडे भरधाव वगाने जाणाऱ्या (एमएच १९, बीएम २८४२) क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी वाहन चालकाला पकडले आणि त्याच वाहनातून बडगुजर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी सुनील मधुकर बडगुजर यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मालवाहू वाहन चालक अचलाराम चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक विजय निकम करीत आहेत.





















