जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हयातील सर्व घरगुती कामगार महिला योजना बंद असून ती चालु काही वर्षापासून जिल्हयात घरेलु कामगार कल्याण्यकार योजना ही बदं असून ती चालु करण्यात यावी. या मागणीसाठी महराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहिततर्फे जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जनहित जिल्हा संघटक चेतन आढळकर, आशिष सपकाळे, राजू निकम उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सदर अधिनियमाच्या कलम 10 अन्वये घरेलु कामगारांसाठी पुढील कल्याणकारी योजनांची तरतुद केलेली आहे. अपघात घडल्यास लाभार्थीना तात्काळ सहाय्य पुरविणे लाभार्थीच्या मुलांच्या शिक्षणसाठी आर्थिक साहाय्य देणे लाभार्थीच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तिच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय खर्चाची तरतूद करणे. महिला लाभार्थीकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे लाभार्थीचा मृत्यु झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे घरेलु कामगारांना जनश्री विमा योजना लागु आहे. अशा विविध योजनेच्या लाभापासून घरेलु कामगार महीला वंचित असून त्यांना लाभ मिळावा या संदर्भात आम्ही जिल्हा भरातील महीला कामगारीच्या वतीने निवेदन सादर करीत आहोत. तरी या असंघटीत महीला कामगारांचा विचार करून आपण बंद असलेली योजना चालु करण्यात यावी अन्यथा या सर्व जिल्हयाभरातील घरेलु कामगार महिलांना घेऊन आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे , महानगर अध्यक्ष विनोद शिंदे , संदीप मांडोळे महानगर अध्यक्ष जळगाव जनहित , गौरव कोळी शहराध्यक्ष जनहित यावल , श्याम पवार तालुका उपाध्यक्ष जनहित यावल ,अजय तायडे जिल्हा उपाध्यक्ष जनहित यांची उपस्थिती होती.