
जळगाव मिरर | संदीप महाले

जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग नियमित विविध कारणाने चर्चेत येत असते मात्र या वेळेस एका अधिकाऱ्याने चक्क बदली होऊन देखील सात ते आठ महिन्यापासून पदभार स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाला या अधिकाऱ्याने केराची टोपली दाखवल्याचे उघड झाले आहे.
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याची गेल्या सात ते आठ महिने आधी अहिल्यानगर येथे बदली झाली असून याचे पत्रक देखील महाराष्ट्र सरकारने जारी केले आहे. मात्र या वरिष्ठ अधिकाऱ्याने अद्यापपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊन आपला पदभार स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची या एका अधिकाऱ्यांनी पायमल्ली केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यावर वरिष्ठ अधिकारी त्या अधिकाऱ्यांवर कुठली कारवाई करणार अशी चर्चा सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात रंगू लागली आहे.
दोन अधिकारी नाशिक जाण्याच्या तयारीत!
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन वरिष्ठ अधिकारी नाशिक येथे बदली करून घेण्याच्या तयारीत असल्याच्या जोरदार चर्चा बांधकाम विभागात सुरू झाल्या आहे. यातील एक अधिकारी यापूर्वीच जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. मात्र त्यांनी अद्याप देखील कुठलाही पदभार हाती घेतला नसून त्यांची आता नाशिक येथे जाण्यासाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे. या विभागातील अधिकाऱ्यांना नाशिक येथे जाण्यासाठी नेमकं कोण मार्गदर्शन करीत आहे व यांची बदली करण्यासाठी कोण अट्टाहास करीत आहे हे देखील आता समोर येणार आहे.
…बदली होऊन देखील अधिकारी जळगाव सोडेना !
सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याची बदली गेल्या आठ महिन्यापूर्वी झाली असल्यावर देखील हे महाशय अधिकारी जळगाव शहर सोडण्याच्या मनस्थिती नसल्याची चर्चा सुरु झाली असून जे काही बिले बाकी असून त्यांची कामे जुन्या पद्धतीने व दिनांकाप्रमाणे करण्यामागे ते लागले असून लवकरच या प्रकरणातील अधिकाऱ्याच्या नावासह पद देखील ‘जळगाव मिरर’ समोर आणणार आहे.





















