जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२३
मुख्य रस्त्यावर विना नंबर प्लेट चारचाकी सुसाट असलेल्या तरुणाला हटकल्याचा राग आल्याने त्याने थेट वाहतूक पोलिसांच्या अंगावर चारचाकी चढविण्याचा प्रयत्न केला असून त्यात पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावला आहे. तो वाटेत येणाऱ्या दुचाकीलाही धडक देत सुसाट निघाला होता नागरिकांनी त्याला अडविण्यासाठी गाडीच्या काचाही फोडल्या अखेर जवळपास पाऊण तासाच्या थरारक पाठ लागल्यानंतर भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याला अटक करण्यात आली आहे ही घटना मुंबईत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी अंधेरीतून मरीन ड्राईव्हकडे येत असताना एका दुचाकीला जबर धडक देत चारचाकी पुढे निघाली यादरम्यान सुंदर महल जंक्शन एन.एस.रोड येथे सिग्नल लागलेला असताना तरी त्याची बाहेर निघण्याची धडपड सुरू होती. दुचाकी वर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांनी या चारचाकीस पुढच्या बाजूने वाहन क्रमांक नसल्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसताच त्यांनी लागलीच ते थांबवले तेव्हा ‘तु बाजू हट जाओ नही तो जान से मार डू डालूंगा’ अशी धमकी या तरुणाने देत त्यांच्या अंगावर देखील चार चाकी चढवली यात पोलीस अमलदार ज्ञानेश्वर बोडके हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी हत्येचा प्रयत्न तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे तरुण ?
नागपूर येथील प्रसिद्ध उद्योजकाचा मुलगा जितेश धवन हा शिक्षण घेत असून अंधेरी परिसरात वास्तव्यास आहे याने ही घटना रविवारी सायंकाळीच्या सुमारास केलेली आहे