जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२३
देशभरात वाढत्या महागाईमुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर गेल्या महिन्याभरापासून सोन्यासह चांदीच्या दरात घट असतांना आता दिवाळीनंतर व लग्नसराईपूवीर्च या दरात मोठी वाढ झाली आहे. सोने-चांदी दिवसागणिक सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. दहा वर्षांत दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी उलथापालथ झाली आहे.
या ऑक्टोबर महिन्यात हमास-इस्त्राईल युद्धानंतर मौल्यवान धातू चमकले. या दिवाळीपासून सोने-चांदीने जोरदार मुसंडी मारली. सोने-चांदीने किंमतीत नवीन रेकॉर्ड केला. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 4 मे 2023 रोजी सोने 61,646 रुपयांच्या विक्रमीस्तरावर पोहचले होते. हा रेकॉर्ड आता इतिहासजमा झाला आहे. चांदी पण या शर्यतीत मागे नाही. चांदी पण चमकली आहे. दोन्ही धातूंनी विक्रमी झेप घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार नुसार, सोन्याने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,913 रुपये प्रति 10 ग्रॅम अशी आहे. 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये असे होते. हा उच्चांक आता मोडीत निघाला. सोन्याने जवळपास 300 रुपयांची झेप घेतली. चांदी पण या शर्यतीत पुढे आहे. चांदी आता 75,000 रुपयांच्या घरात पोहचली आहे.