जळगाव मिरर | २७ जुलै २०२३
जळगाव शहरातील रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत दि. २३ जुलै रोजी आय एस.एस.एस महिला टीम जळगांव तर्फे रंग भरा चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेच्याच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. ही स्पर्धा सिंधी कॉलनीतील आदर्श विद्यालयात घेण्यात आली.
या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. जिंकणे महत्त्वाचे नसून सहभागी होणेही तेवढेच महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे स्पर्धांमुळे मुलांना आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास चालना मिळते . असे मार्गदर्शन महिला टीमच्या अध्यक्ष शोभा परवानी यांनी केले. रोझलँड इंग्लिश मीडियम मधील इयत्ता 1 ली बाल गटातून अर्श शकील खाटीक या विद्यार्थ्याने तिसरा क्रमांक पटकावला. तर मोठ्या गटात दुसऱ्या क्रमांकावरती इयत्ता 7 वी गटातून माविया सय्यद नईम व तिसरा क्रमांक अल्टमश साजिद खाटिक यांनी मिळवला. या स्पर्धेचे स्पर्धेचे बक्षीस वितरण रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत स्वर्गीय लता मंगेशकर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.