जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२४
भुसावळ शहरातील अयोध्या नगरात बेकायदा देशी बनावटीचा गावठी कट्टा सोबत घेऊन दहशत माजवणाऱ्या संशयित आरोपीला भुसावळ शहर पोलिसांनी कारवाई करुन अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील आयोध्या नगरमधील जगन धर्मा कोळी (वय ४४) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, अयोध्या नगरात परिसरात संशयित आरोपी जगन कोळी हातात गावठी बनावटीचा कट्टा घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी १७ ऑगस्टला दुपारी ४ वाजता कारवाई करुन संशयित जगन कोळी याला अटक केली. त्याच्याकडून १० हजाराचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त केला. याप्रकरणी पो.कॉ. राहुल भोई यांच्या फिर्यादीवरून संशयित जगन कोळी याच्याविरोधात भुसावळ शहर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक इक बाल सय्यद करत आहेत.