जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२४
रिक्षा बसलेल्या तरुणीची छेड काढल्याच्या संशयावरुन दोघ परप्रांतीय तरुणांना नागरिकांनी पब्लिक मार दिला. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्वातंत्रय चौकात घडली. दरम्यान, पोलिसांनी त्या दोघांनी सुटका करीत त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. मात्र तरुणीने तक्रार न दिल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली तरुणी रिक्षातून जात होती. यावेळी रिक्षात बसलेल्या दोघ परप्रांतीय तरुणांनी त्या तरुणीची छेड काढली. दरम्यान, तरुणीने तरुणीने त्या दोघांना जाब विचारल्यानंतर तेथे असलेल्या नागरिकांनी त्या दोघ तरुणांनी यथेच्छ धुलाई केली. घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळताच, पोलीस ठाण्यातील कर्मचारी विशाल साळुंखे आणि नरेंद्र दिवेकर यांनी घटनास्थळी धाव घेत दोघ तरुणांची नागरिकांच्या तावडीतून सुटका करीत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणी रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.