जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२३
राज्याच्या राजकारणातील ठाकरे गटाच्या दिग्गज नेत्याचा घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे झाल्याचं आढळून आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी आणि घाटकोपर परिसरतील ठाकरे गटाचे नेते सुधीर मोरे प्रत्येक कामात त्यांचा पुढाकार असायचा. धडाडीचा नेता, कार्यकर्ता म्हणून विक्रोळी आणि घाटकोपर परिसरात त्यांचा चांगला परिचय होता. त्यांचा मृतदेह संदिग्ध स्थितीत आढळल्याने अनेक कयास लढवले जात आहेत. मोरे यांचा घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर मृतदेह सापडला आहे. त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे झाल्याचं आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुधीर मोरे यांचा मृतदेह काल गुरुवारी रात्री रेल्वे रुळावर पडलेला आढळला. सुधीर मोरे एका खासगी मिटिंगला जातो म्हणून घराबाहेर पडले होते. त्यांनी सोबत बॉडीगार्डही नेले नव्हते. मात्र, बराच उशीर झाला तरी मोरे परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता घाटकोपर रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे झालेले होते. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मोरे यांच्या मृत्यूचे वृत्त वाऱ्यासारखं पसरल्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. गुरुवारी रात्री नेमकं काय घडलं? मोरे या ठिकाणी का आले होते? कुणाला भेटले होते का? की एकटेच होते? आदी प्रश्नांचा शोध घेतला जात आहे.
सुधीर मोरे माजी नगरसेवक होते. ते शिवसेनेचे विभाग प्रमुखही होते. शिवसेनेतील फुटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी लोकांचे दोस्त नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून ते गोरगरीबांची सेवा करत होते.