जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३ ।
महाशिवरात्रीनिमित्त सोनी नगरातील स्वयंभू महादेव मंदिरात पहिल्यांदा तीन दिवस भक्ती गीते, होम हवन, पार्थिव शिवलिंग, कीर्तनाचा भाविकांनी घेतला आनंद. स्वयंभू महादेव मंदिराच्या प्रांगणात दि.१६ ते १८ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोड, सोनी नगर परिसरात २०१७ साली श्रावण महिन्याच्या सोमवारी एका घराचे खोदकाम सुरू असताना महादेवाचे शिवलिंग आढळून आले होते. त्यानंतर नागरिकांनी ११ जुलै २०१८ रोजी मंदिराची स्थापना केली. त्यानंतर २०२२ ला आता मंदिराचा जिर्णोद्धार सुरू झालेला आहे. जागृत शिवलिंग असल्याची भाविकांमध्ये श्रद्धा आहे. तसेच भाविकांची मनोकामना पूर्ण होत असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होत असते.
दि. १६ रोजी भगतसिंग चावरिया, सतीश बाटूंगे, किशोर मोरे, मोहन गारंगे, कुलदीपसिंग पाटील, यांनी कराओके हा भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर केला. तसेच दि. १७ फेब्रुवारी रोजी हभप देवदत्त मोरदे महाराजांनी सुश्राव्य वाणीतून महाशिवरात्रीचे महत्व काय असल्याची माहिती प्रवचनाद्वारे दिली. शनिवारी १८ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे ५ वाजता स्वयंभू महादेव शिवलिंगावर दुग्ध व रुद्राक्ष अभिषेक झाल्यानंतर चेतन कपोले गुरुजी यांच्या उपस्थितीत कस्तुरी सुपर शॉपीचे संचालक विजय राणा हे पत्नीसह व 10 जोडप्यासह होम हवन पूजा करण्यात आली.
दुपारी 2 ते 4 वाजता प्रियंका त्रिपाठी यांच्या भक्ती महिला मंडळातर्फे भक्ती भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. संध्याकाळी ५ वाजता 51 पार्थिव शिवलिंग पूजन झाले. आमदार राजु मामा भोळे यांच्या हस्ते स्वयंभू महादेव मंदिराच्या प्रांगणात हायमॉस्ट ल्याम्पचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरेश सोनवणे, अतुल बारी, आदि मान्यवर उपस्थित होते. रात्री 8 वाजता ह.भ.प मंगल महाराज, ह.भ.प अविनाश दातर्तीकर महाराज यांचे किर्तन झाले. सूत्रसंचालन संजय दुसाने तर आभार नरेश बागडे यांनी मानले
कार्यक्रमासाठी परीश्रम
सरदार राजपूत, मधुकर ठाकरे, देवीदास पाटील, यशवंत पाटील, नारायण येवले, भैय्यासाहेब बोरसे, संजय भोई, कैलास कोळी, विजय चव्हाण, धनंजय सोनार, सुर्यकांत पारखे अजय बागडे, निलेश जोशी, गणेश जाधव, मुकुंद निकुंभ, विलास दांडेकर, गणेश माळी, विनोद निकम, पंकज राजपूत, उदय महाले, ओमकार जोशी, वेदांत बागडे, रोहित बोरसे तसेच बाल गोपाळ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.