जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२४
जळगाव शहर मनपात बातमी वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराचा कॅमेरा हिसकावून व त्यातील मेमरी कार्ड काढल्याप्रकरणी शहर पोलिसात मनपा सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात पत्रकार कापडणे यांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आज जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनतर्फे निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, पत्रकार विक्रम कापडणे हे महानगर पालिकेत बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता यांचा कॅमेरा हिसकावून घेणे व त्यातील मेमरी कार्ड काढणे, दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून लोकशाहीचा आवाज दाबनाऱ्या मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रूले यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह जळगाव शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.