जळगाव मिरर । १ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना एक भीषण अपघात पारोळा शहरापासून नजीक असलेल्या महामार्गावर घडला आहे. दि. १ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचे समजते. या अपघातात तीन महिला तर २० ते २५ जण जखमी असल्याचे समजते. अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी पोलिस व चार ते पाच रुग्णवाहिका मदत कार्यासाठी पोहचल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील बोळे येथून अंत्यविधीसाठी जाताना पिकअप वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप वाहन, ट्रक, जीपच्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर एका महिलेचा गंभीर अवस्थेत धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जवळपास २० जण जखमी झाले. पारोळा शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या विचखेडे गावाजवळ हा अपघात आज शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या दरम्यान झाला. बोळे येथील २० ते२५ जण शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे अंत्यविधीसाठी जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विचखेडे गावानजीक हा भिषण अपघात झाला.
या अपघातात रेखाबाई गणेश कोळी 55, योगिता रवींद्र पाटील वय 40 या दोन महिलांचा मृतांमध्ये समावेश असून रणजीत सुरसिंग गिरासे वय 60, भरत रामभाऊ गिरासे वय 45, राजेराबाई कोळी वय ४५ ,भीमकोर सत्तरसिंग गिरासे 50, चंदनबाई नाना गिरासे 50 ,भुराबाई गिरासे , रेखाबाई र गिरासे वय 50 ,नाना भाऊ सुभाष गिरासे 55 ,भटाबाई साहेबराव गिरासे 45, सुनीता नारायण गिरासे 44 ,भुराबाई भिमसिंग गिरासे , अजित सिंग गिरासे वय 50 ,सय्यद लियाकत वय 21 ,हिराबाई विजय सिंग गिरासे, भिमकोर बाई भगत गिरासे, भगवान सिंग गिरासे ,राजनसिंग भारत सिंग गिरासे, रूप सिंग गिरासे ,दगाबाइ रुपसिंग गिरासे ,राजेबाई साहेबराव कोळी वय ४५, आदींचा जखमींमध्ये समावेश असून यातील पाच जण गंभीर असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील सामान्य रुग्णालय उपचारासाठी पाठवण्यात आले असून अन्य काही जखमींना जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच उर्वरित जखमींवर पारोळा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. .