जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२४
राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच बीड जिल्ह्यातील शहापूर येथील राष्ट्रीय महामार्ग ७५३ जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. ही घटना सकाळी ८ च्या दरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, जाहीच सहाजण ठार झाले आहेत. अनेकजण गंभीर जखमी झाली आहेत. जखमींची संख्या व मृतांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग ७५३ जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्गावर दि.२० सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास बस व आयशरचा भीषण अपघात झाला. बस एम एच 20 बि एल 3553 अंबाजोगाई येथुन संभाजी नगरच्या दिशेने जात होती. तर, आयशर क्रमांक एमएच 01 सी आर 8099 अंबड कडून बीडकडे संत्रा घेऊन जात होता. दरम्यान शहापूर ते मठ तांडा या भागात बस व आयशरचा समोरासमोर जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि बस व आयशरचा समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर सहाजण जागीच ठार झाले आहेत.