जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील कालिकांत माता मंदिर परिसराजवळ आज दि.23 रोजी हातात पिस्तूत घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील भुसावळकडे जाणाऱ्या हायवे रस्त्यावर असलेले कालिंका माता मंदिराजवळ सार्वजनिक परिसरात एक तरूण गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी किरणकुमार बकाले यांना मिळाली, त्यानुसार त्यांनी तपासचक्रे फिरवित सहाय्यक फौजदार अशोक महाजन, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, अविनाश देवरे यांच्या पथकाने बुधवार ही कारवाई करीत तरूणाला अटक करून गावठी पिस्तूल जप्त केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे