जळगाव मिरर / २३ मार्च २०२३ ।
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार नुकतेच जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी आले असता धरणगाव शहरात ठाकरे गटाने त्यांच्या दौऱ्यात अडथळा निर्माण केल्याबाबत ठाकरे गटाच्या १२ पदाधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव शहरातील पारोळा नाक्याच्या पुढे असलेले यश प्रोव्हिजन या ठिकाणाहून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे जात असता असतांना या ठिकाणी १२ ते १३ लोकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असून तर यासाठी पोलीस स्थानकाची कुठलीही परवानगी देखील घेतली नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे भंग करीत मंत्र्यांचा दौऱ्यात गदारोळ निर्माण झाल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात पोना.मिलिंद सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुलाबराव वाघ, निलेश सुरेश चौधरी यांच्यासह १० जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि जिभाऊ तुकाराम पाटील हे करीत आहेत.