जळगाव मिरर | २ जानेवारी २०२४
भुसावळ शहरातील एका परिसरात पोलिसावर चाकूने हल्ला करुन फरार असलेल्या सुनिल व्यंकय्या मैलेलू (वय २२) या तरुणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्य केली. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास लोको शेडजवळ घडली. पोलिसांच्या भितीपोटी त्याने आत्महत्या केल्याची चर्चा शहरात सुरु होती. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादानंतर मुलाकडून आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्रस्त पित्याने ११२ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केली. मदतीसाठी गेलेल्या बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी अक्षय चव्हाण यांच्यावर संशयित सुनिल याने हल्ला करुन तो फरार झाला होता. पोलिस त्याच्या शोध घेत असताना संशयीत तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या तरुणाचा मृतदेह शहरातील सुंदर नगरमागे असलेल्या रेल्वे लोको शेडजवळील रेल्वे रुळावर आढळून आला. पोलिसांच्या भितीपोटी त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा सुरु होती. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.