जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२३
देशभरातील अनेक शहरात छोटे मोठे स्फोट होण्याच्या घटना घडत असतात, अशीच एक धक्कादायक घटना पंजाबमधील पाटियालामध्ये मंगळवारी सकाळी एका घरात प्रेशर कुकरचा मोठा स्फोट झाला असून यात सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओतील दृष्यांनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास एका घरातील स्वयंपाकगृहात पाच-सहा जण उभे असून एका बाजूला गॅसवर कुकर दिसत आहे. सर्वजण आपापले काम करत आहेत. परंतु अचानक मोठा आवाज होतो अन् प्रेशर कुकरचा स्फोट होतो. घरातील सदस्यांना काही सेकंद नेमंक काय घडलं हेच समजत नाही. सर्वजण प्रेशर कुकरचा स्फोट झाल्यावर लांब पळतात.
Blast in Cooker while preparing "SAAG"
Hopefully they are safe 🙏#ParliamentAttack #Sooreede #Salaar BJP MP #Dortmund #cates pic.twitter.com/2x5Jzkvy5r— Ankit Khanna (@ankit_khanna) December 13, 2023
प्रेशर कुकरच्या स्फोटानंतर कुकरचे झाकण छताला आदळताना दिसत आहे. त्यामुळे छताचा काही भाग आणि फर्निचर खाली पडतो. या स्फोटामुळे स्वयंपाकघरात सर्वत्र धूर पसरला. प्रेशर कुकरच्या स्फोटामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या स्फोटात कोणालाही दुखापत झाली नाही. जेव्हा कुकरमध्ये वाफ तयार होते आणि शिट्टी होत नाही तेव्हा कुकरचा स्फोट होण्याची दाट शक्यता असते.