जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२६
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील, कर्तव्यदक्ष व जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करणारे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरात विधानसभा क्षेत्र प्रमुख श्याम भाऊ कोगटा यांच्या पुढाकाराने शिवसेना युवा सेना व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव यांच्या वतीने भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जनतेची सेवा हाच खरा वाढदिवस साजरा करण्याचा मार्ग आहे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते श्याम भाऊ कोगटा यांच्या पुढाकाराने करण्यात आले. समाजातील गरजू, वंचित व निराधार बांधवांना अन्नदान करून माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व अधिक बळ मिळावे, अशी मनोभावे सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या भावनिक व सेवाभावी उपक्रमाला जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज भाऊ चौधरी, युवा सेना जिल्हाप्रमुख रोहित भाऊ कोगटा, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जितेंद्र गवळी, शिवसेना सोशल मीडिया उपजिल्हा प्रमुख सोनु तायडे, युवा सेना उपमहा नगर प्रमुख विशाल निकम, महानगर प्रमुख दीपक पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती लाभली.
माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे केवळ एक नेता नसून सर्वसामान्यांचा आधारवड आहेत. त्यांच्या संवेदनशील नेतृत्वातून प्रेरणा घेऊन शिवसेनेचे कार्यकर्ते सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेचे कार्य करत आहेत, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रम अत्यंत भावनिक, उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. शेवटी उपस्थित शिवसैनिकांनी “एकनाथजी शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा भावना व्यक्त करत वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




















