
जळगाव मिरर / ८ एप्रिल २०२३ ।

जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून खुनाची मालिका सुरूच आहे. नुकतेच रावेर तालुक्यातील निमड्या गावात एका इसमाचा गावापासून एक किलोमीटर अंतरावर खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, रावेर तालुक्यातील निमड्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर तरुणाचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना शनिवारी सकाळी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी धाव घेतली. घटनास्थळी डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मयताच्या खुनाचे कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे. यावेळी रावेर पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.




















