
जळगाव मिरर / १८ एप्रिल २०२३ ।

सून व सासऱ्याचे नाते अगदी वडील व मुलगी प्रमाणे असते पण याच नात्याला जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात काळिमा फासला गेला आहे. जळगाव जिल्ह्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेदिवस वाढत जात आहे. यात पुन्हा या घटनेची भर पडली आहे. धरणगाव तालुक्यातील १९ वर्षीय सुनेवर अत्याचार केल्याप्रकरणी सासऱ्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावात रहिवासास असलेल्या सुनेला सासऱ्याने दि २९ मार्च ते ११ एप्रिल या दरम्यान शेतात व राहत्या घरात वेळो वेळी जबरदस्ती चुकीचे कृत्य केले म्हणून सुनेने पोलिसात धाव घेत सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउनी.संतोष पवार हे करीत आहेत.




















