जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२४
देशातील अनेक ठिकाणी प्रेम विवाहाच्या माध्यमातून हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच कर्नाटक येथे प्रेमविवाह झाल्यानंतर काही तासांतच प्रियकराने प्रेयसीची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची भयंकर घटना कर्नाटकच्या कोलारमध्ये घडली आहे. या घटनेनंतर आरोपीने स्वतःवरही कुऱ्हाडीचे वार करून आत्महत्या केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, एकमेकांच्या गावाशेजारी राहणाऱ्या नवीन कुमार व लिखिता श्री यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या कुटुंबीयांनी नुकतेच 7 ऑगस्ट रोजी त्यांचे धुमधडाक्यात लग्न लावले. यामुळे दोन्ही कुटुंबांत आनंदाचे वातावरण होते. पण त्यानंतर काही कारणावरून नवरी व नवरदेवात वाद झाला. तो सोडवण्यासाठी ते गावातीलच एका घरात केले. त्यानंतर नवीनने अचानक लिखिता श्रीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात ती जागीच गतप्राण झाली. त्यानंतर त्याने स्वतःवरही कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यात तो ही गंभीर जखमी झाला. हे दोघे बराचवेळ दिसले नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. त्यावर ते एका घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी तत्काळ त्यांना लगतच्या रुग्णालयात हलवले. पण तिथे डॉक्टरांनी लिखिताला मृत घोषित केले. त्यानंतर काही गुरुवारी सकाळी नवीनचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.