
अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर शहरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील हेडावे रोड परिसरातील एका नगरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस दि ४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाने काही तरी आमिष देत पळवून नेल्याची धककादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.सुनील पाटील हे करीत आहेत.




















