जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२३
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील पोलिस दलात कार्यरत पत्नी व पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्यानंतर पतीनेदेखील गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. वर्षा किशोर कुटे, दीड वर्षाची मुलगी कृष्णा किशोर कुटे आणि किशोर कुटे अशी मृतांची नावे आहेत.
या दाम्पत्याला एक आठ वर्षांची व एक दीड वर्षाची अशा दोन मुली होत्या. वर्षा सोमवारी कर्तव्यावरून घरी परतल्यानंतर पती किशोर याने कांदा कापण्याच्या धारदार चाकून त्यांची गला चिकन हत्या केली. सोबतच दीड वर्षांच्या चिमुकलीचीही अत्यंत निर्घृणपणे गळा चिरुन हत्या केली. पत्नीसह चिमुकलीला संपविल्यानंतर किशोरने शहरापासून जवळच असलेल्या गांगलगाव शिवारात गळफास लावून घेतला. आठ वर्षांची चिमुकली शाळेत गेलेली असल्याने वाचली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.