• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

रा.कॉ.महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे नेतृत्व ठरतेय प्रभावी

मुंबई येथील पहिल्याच बैठकीला राज्यभरातील महिला पदाधिकाऱ्यांची भरगच्च उपस्थिती.

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 12, 2023
in जळगाव ग्रामीण, जळगाव, राजकीय, राज्य, सामाजिक
0
रा.कॉ.महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे नेतृत्व ठरतेय प्रभावी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२३

रोहिणीताई खडसे एक उमदं नेतृत्व…! राजकारणाचा फारसा अनुभव नसला, तरी त्यांना महाराष्ट्राचे ज्येष्ठ,मुत्सद्दी नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या तालमीत राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे . शैलीदार व अभ्यासू वक्तृत्व आक्रमक नेतृत्व आणि जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करण्याची धडपड यामुळे राजकारणात परिपक्व असल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीतून दिसून येते.

त्यांच्या अंगीभूत असलेली ही चुणूक हेरून राजकारणातील जाणता राजा असलेल्या शरद पवार साहेबांनी रोहिणी ताईंकडे थेट महिला प्रदेशाध्यक्षपदाची खूप मोठी जबाबदारी सोपवली. त्यांच्या नेतृत्वाखाली दि. 11 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरला आयोजित बैठकीला राज्यातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भरगच्च उपस्थिती होती. नियोजनबद्ध यंत्रणेद्वारा अत्यंत यशस्वीरित्या पार पडलेल्या या बैठकीने मात्र रोहिणीताईंची राजकारणातील परिपक्वता अधोरेखित केली.

या बैठकीला शरद पवार साहेबांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया ताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील , राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, पक्षाच्या नेत्या मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखाताई पेडणेकर, व महिला कार्यालयीन सचिव स्वातीताई माने यांचेसह राज्यभरातून आलेल्या विविध जिल्ह्यांच्या अध्यक्षा,तालुकाध्यक्षा व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
ऑक्टोबर 2020 मध्ये जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यासोबतच रोहिणीताई खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाथाभाऊंनी त्यांचं उभं आयुष्य भारतीय जनता पार्टी साठी वाहून दिलं . उत्तर महाराष्ट्राला भाजपाचा बालेकिल्ला बनवला.मात्र त्याच पक्षाने आमदार खडसेंची कोंडी करत राजकीय कारकीर्द संपवण्याची खेळी केली.

त्यामुळे नाईलाजाने पक्ष सोडण्याचा निर्णय नाथाभाऊंना जड अंतकरणाने घ्यावा लागला. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी अचूक निशाणा साधत खडसे साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करत विधान परिषदेवर संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचा निर्धार आ.खडसेंनी केला, यावेळी भाऊंना साथ देण्यासाठी रोहिणीताई पुढे सरसावल्या.

त्यांच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेचे आयोजन करून राष्ट्रवादी संघटन मजबूत करण्यासाठी यशस्वी पाऊल उचलले. रोहिणीताईंची पक्षसंघटनासाठी सुरू असलेली धडपड, त्यांची आक्रमकता, उत्तम संघटन कौशल्य, पक्षासाठी अहोरात्र वेळ देण्याची तयारी, अमोघ वक्तृत्व असे अंगी भूत असलेले नेतृत्व गुण ओळखून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाची माळ रोहिणी ताईंच्या गळ्यात घातली, जबाबदारी अजूनच वाढली. नाथा भाऊंच्या बरोबरीने राज्यामध्ये महिला संघटन कसे वाढवता येईल ? यासाठी जणू त्यांनी आव्हान स्वीकारले.

पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्या सोबत नुकताच विदर्भ आणि मराठवाडा दौरा करून महिला संघटनेची मोट अधिक मजबूत करण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले. त्याचा परिपाक म्हणून दिनांक 11 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली उपस्थिती लक्षणीय राहिली. रोहिणी ताईंच्या नेतृत्वाखाली आयोजित हे पहिलीच यशस्वी झालेली बैठक हे त्यांच्या कणखर नेतृत्वाची झलकच म्हणावी लागेल.

2019 च्या निवडणुकीमध्ये अल्पशा मतांनी पराभूत झाल्यानंतर मतदार संघातील जनसामान्यांची सुखदुःख समजून घेण्यासाठी रोहिणी ताई गेल्या चार वर्षापासून सतत जनसामान्यांच्या संपर्कामध्ये आहेत नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अन्य घटना असतील त्या सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. महिलांसाठी तर जणू त्या हक्काचे व्यासपीठ बनलेले आहेत. त्यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेस जनसंवाद यात्रा ही कमालीची यशस्वी झाली. या यात्रेची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली. राज्यात पहिल्यांदाच असं घडलं. व जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनातून काढलेली ही यात्रा रोहिणी ताईंना वैयक्तिक संपर्कासाठी अतिशय महत्त्वाचे ठरली. या यात्रेचे तोंड भरून कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आले.

जनसंवाद यात्रेसोबतच रोहिणी ताईंच्या संकल्पनेतील “”आमचे घर –राष्ट्रवादीचे घर””, “” शिक्षणाचा श्री गणेशा “” या दोन्ही अभियानांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोडशेडिंग आंदोलनातील सहभाग असो ही नैसर्गिक आपत्ती असो,प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला ताई तिथे जातीने हजर असतात.जन आक्रोश मोर्चा,कंत्राटी भरती निषेध आंदोलन, स्वयं सिद्धा प्रशिक्षण वर्ग,नवरात्रोत्सव दांडिया कार्यक्रम,गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमातून गुणवंतांच कौतुक अशा वैविध्यपूर्ण उपक्रमातून रोहिणीताई खडसे सतत मतदारांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. राजकारणातून जास्तीत जास्त समाजकारण कसे करता येईल ? यावर त्यांचा कटाक्ष असतो. खानदेश दैवत आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईच्या 744 व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांनी श्रीक्षेत्र कोथळी येथे दिनांक 15 रविवारी “” भव्य दुर्गा सप्तशती पाठाचे “” आयोजन केले आहे अशा अध्यात्माची प्रचंड आवड असलेल्या सुसंस्कारित रोहिणी ताईंकडे भावी आमदार म्हणून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ मोठया आशेने पाहत आहे.

एकंदरीत, पक्षाध्यक्ष शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीने हेरलेलं रोहिणीताईच्या रुपातील हे प्रभावी नेतृत्व निश्चितपणे राज्यात महिला संघटन मजबूत करुन राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देईल हे निर्विवाद.

Related Posts

आ.राणेंची मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका !
राजकीय

आ.राणेंची मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका !

December 10, 2023
अमळनेर अवैध वाळू वाहतूक जोरदार : पथकाने पकडली वाहने !
जळगाव ग्रामीण

अमळनेर अवैध वाळू वाहतूक जोरदार : पथकाने पकडली वाहने !

December 10, 2023
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !
राज्य

पाच दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण !

December 10, 2023
तू तर अकलैने दिव्यांग : मंत्री भुजबळांचा मनोज पाटलांवर हल्लाबोल !
राजकीय

तू तर अकलैने दिव्यांग : मंत्री भुजबळांचा मनोज पाटलांवर हल्लाबोल !

December 9, 2023
अवघ्या ६ वर्षीय बालिकेच्या अंगावर कुत्र्यांनी घेतला २५ ठिकाणी चावा !
जळगाव ग्रामीण

अवघ्या ६ वर्षीय बालिकेच्या अंगावर कुत्र्यांनी घेतला २५ ठिकाणी चावा !

December 9, 2023
भाविकांसाठी आनंदाची बातमी : अमळनेरातून शिवमहापुराणसाठी बसची व्यवस्था
जळगाव ग्रामीण

भाविकांसाठी आनंदाची बातमी : अमळनेरातून शिवमहापुराणसाठी बसची व्यवस्था

December 8, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023
ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

April 15, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तरूणासोबत लॉजवर आली अन दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह !

तरूणासोबत लॉजवर आली अन दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह !

December 10, 2023
आ.राणेंची मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका !

आ.राणेंची मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका !

December 10, 2023
महामार्गावर दोन भीषण अपघातात : २ ठार तर ११ गंभीर जखमी !

महामार्गावर दोन भीषण अपघातात : २ ठार तर ११ गंभीर जखमी !

December 10, 2023
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जळगावात तरुणीशी अश्लील चाळे : वडिलांना मारून टाकण्याची दिली धमकी !

December 10, 2023

Recent News

तरूणासोबत लॉजवर आली अन दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह !

तरूणासोबत लॉजवर आली अन दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह !

December 10, 2023
आ.राणेंची मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका !

आ.राणेंची मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका !

December 10, 2023
महामार्गावर दोन भीषण अपघातात : २ ठार तर ११ गंभीर जखमी !

महामार्गावर दोन भीषण अपघातात : २ ठार तर ११ गंभीर जखमी !

December 10, 2023
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जळगावात तरुणीशी अश्लील चाळे : वडिलांना मारून टाकण्याची दिली धमकी !

December 10, 2023

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group