जळगाव मिरर । २५ ऑगस्ट २०२३
देशभरातील अनेक व्हिडीव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात, त्यातील अनेक व्हिडीओ दहशत निर्माण करणारे असतात, हि दहशत निर्माण करणारे देखील अल्पवयीन असतात पण व्हिडीओ बनविण्यासाठी वाटेल ते करण्याच्या त्यांचा अट्टाहास असतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक तरुणी भरधाव बाईकवर उभी राहून पिस्तूल हलवत असून स्टंट करत होती. तर दुचाकी तरुणीचा मित्र असलेला चालवत होता. हि घटना पाटणा राजधानीच्या मरीन ड्राईव्ह (गंगा पथ) येथून शनिवारी १९ ऑगस्ट रोजी घडली. यावेळी एकाने व्हिडीओ बनविला असून पोलिसांनी त्यांना अटक देखील केली आहे. यातील तरुणाचे विशाल नाव असल्याचे समजते.
पिस्टल लहराना है गलत। ये माना है मरीन ड्राइव पर पिस्टल लहराने के लिए जेल गई युवती ने। आप लोग भी इंस्टाग्राम के कुछ लाइक्स के लिए ऐसे स्टंट्स न करे । ये गैर कानूनी तो हैं ही , जनलेवाभी हो सकते है हैं।@PatnaPolice24x7 @Dysplaopatna #Buddhacolony PS#say no to stunts pic.twitter.com/1BM9qPvXP1
— SP Central Patna (@CentralSP_patna) August 23, 2023
या संपूर्ण प्रकरणी एसडीपीओ यांनी सांगितले की, मरीन ड्राइव्हवरील तरुण आणि तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तरुणी पिस्तुल हलवत दुचाकीवरून जात होती. त्याला सिपारा येथून अटक करण्यात आली आहे. त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. त्या तरुणाचे नाव विशाल असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याने पिस्तूल आणले होते. त्या दिवशी मुलीचा वाढदिवस होता. पिस्तूल मुलीला तिच्या मैत्रिणीनेच दिले होते जेव्हा तिने तो व्हिडीओ बनवला होता. मुलाच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत आहेत. ज्या बाईकवर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे ती अद्याप सापडलेली नाही. पिस्तूल खरी आहे की बनावट या प्रश्नावर एसडीपीओ यांनी सांगितले की, कारण त्या मुलानेच पिस्तूल आणल्याचे मुलीने सांगितले आहे. तेथे अटक केल्यानंतर तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम आयडीवरून व्हिडिओ अपलोड केल्याचे सांगितले. त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता त्यामुळे त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्र रिव्हॉल्वर घेऊन आले होते. त्याने बंदूक बाहेर काढल्यावर मी व्हिडिओ बनवला. आमची चूक झाली. मी तुम्हाला हे करू नये अशी विनंती करतो.