जळगाव मिरर / १४ फेब्रुवारी २०२३ ।
देशभर आज प्रेमाचा दिवस साजरा होत आहे. बहुतेक प्रेमीयुगुल आपल्या प्रिय व्यक्तीला सोने व चांदीचे दागिने भेट देणार असतील तर हि बातमी त्यांच्यासाठी महत्वाची आहे. भारतीय सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोन्याचा दर 56,982 रुपयांवर पोहोचला आहे. तर एक किलो चांदीचा दर खाली आला असून, तो आता 66,802 रुपयांवर गेला आहे. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली.
दिल्ली सराफा बाजारात सोने 114 रुपयांच्या वाढीसह सोमवारी 10 ग्रॅमचा दर 56,982 रुपये झाला तर गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 56,868 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. याशिवाय, चांदीचा भाव 319 रुपयांनी घसरून 66,802 रुपये प्रति किलोवर बंद झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, ‘दिल्लीतील स्पॉट सोन्याचे भाव 114 रुपयांनी वाढून 56,982 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत.’
विशेष म्हणजे शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी जानेवारीमध्ये गोल्ड ईटीएफमधून 199 कोटी रुपये काढून घेतले. यासह, गोल्ड ईटीएफमधून पैसे काढण्याचा हा सलग तिसरा महिना होता.