जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२४
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दि.१३ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी आज दि.१२ रोजी सागर पार्क येथे होणाऱ्या कार्यक्रमस्थळी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक नखाते, डी. वाय. एस. पी संदीप गावित व मुख्यमंत्र्याच्या बंदोबस्त असलेल्या पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, येत्या काळात येणाऱ्या निवडणुका पाहून कोणत्या घोषणा आमच्या सरकारने केलेल्या नाही. हा संयोग आहे की या योजना जाहीर झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी निवडणुका लागत आहे. जिल्ह्यात एकच सीटची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शिंदे गटाची ताकद सर्वांधिक राहील असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण या कार्यक्रमाची सुरुवात जळगावतूनच होणार आहे कारण युतीच्या दोन्ही लोकसभेमध्ये सीटा निवडून आलेल्या आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी जळगाव जिल्हा हा फलदायी आहे व येत्या काळातही हा युतीसाठी फलदायी राहणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्र्यांनी केले. या सरकारने ज्या योजना आणल्या आहेत. त्या मागील सरकारने आणल्या नव्हत्या. एसटी महामंडळात मोफत प्रवास, मुलीचा जन्म होतास 1 लाख, मुलींना मोफत शिक्षण, चार धाम यात्रा असे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेले आहेत व देशाच्या पातळीवर पहिले राज्य की जे मुलींना मोफत शिक्षण देते. प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या अर्थ लावले जातात. कोणतीही योजना निवडणुकीच्या तोंडावर आणली नाही. अर्ध तिकीट योजना आणली मोफत शिक्षण योजना आणली त्यावेळेस कोणतेही निवडणुका नव्हत्या असे वक्तव्य पालकमंत्री यांनी केले.