जळगाव मिरर / १० एप्रिल २०२३ ।
राज्यात सध्या तरुणाईला आपल्या तालावर नाचायला लावणारी लावणी क्वीन गौतमी पाटील हिने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गौतमीच्या नृत्यावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर सुद्धा फॅन्स जीव ओवाळून टाकतात.सबसे कातिल गौतमी पाटील असणाऱ्या गौतमीच्या पहिल्या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. घुंगरू असं या सिनेमाचं नाव आहे.
घुंगरू सिनेमात गौतमी लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसतेय. स्त्री म्हणून अन्याय झालेली एक लावणीसम्राज्ञी म्हणून गौतमी दिसतेय. काहीच दिवसांपूर्वी गौतमीने तिच्या सिनेमाबद्दल माहिती दिली होती. गौतमी म्हणाली… “माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका काय असेल हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा.”
गौतमी पुढे म्हणते.. “या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचं शूटींग सुरु आहे. चित्रपटाचं शूटींग पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीखेची घोषणा करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा” असं आवाहन गौतमीने केलं होतं.