अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील एका गावातून ३१ वर्षीय तरुणाने रात्री घराबाहेर लावलेली दुचाकी अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पिंपळी येथील रहिवासी धनराज सोनवने यांच्या मालकीची दुचाकी क्र.एम.एच.१९.सी.के.५९०७ सुमारे १० हजार रुपये किमतीची दुचाकी दि २४ जानेवारी रोजी रात्री तरुणाने आपल्या घराबाहेर लावलेली असतांना अनोळखी चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील जाधव हे करीत आहेत.