जळगाव मिरर / १७ मार्च २०२३
अमळनेर तालुक्यातील एका घराच्या बाहेर ठेवलेली चावी घेत चोरटयांनी घरफोडी करीत ६२ हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. हि घटना तालुक्यातील शिरसाळे येथे घडली आहे. या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील शिरसाळे येथील भटू शिवदास पाटील (५०) हे परिवारासह वास्तव्यास आहे.१५ मार्च बुधवार रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने बाहेर ठेवलेल्या चावीने दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटातून 50 हजारांची रोकड तसेच 12 हजारांचे दागिने असा एकूण 62 हजारांचा ऐवज लांबवला. भटू पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर गुरुवारी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भरत ईशी करीत आहेत.