जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२४
पुतण्याचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कैलास मंगल पाटील (वय ५३) यांना तिघांनी बेदम मारहाण केली. तसेच सचिन घनश्याम पाटील याने त्याच्या हातील वस्तूने त्यांच्या कानावर मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २४ रोजी सायंकाळी ७ वाजता तालुक्यातील आव्हाणे गावात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात कैलास मंगल पाटील (वय ५३) हे वास्ताव्यास असून ते शेती करतात. दि. २५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचा पुतण्या मुरलीधर शांताराम पाटील, सोपान सुभाष पाटील यांचे सचिन घनशाम पाटील यांच्यासोबत भांडण सुरु होते. कैलास पाटील त्यांच्यातील भांडण सोडविण्यासाठी गेले असता, प्रदिप पाटील याने त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्यानंतर सचिन पाटील याने मागून येवून कैलास पाटील यांच्या कानावर कोणत्या तरी वस्तूने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. जखमीवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित घनशाम धनराज पाटील, सचिन घनशाम पाटील, प्रदीप घनशाम पाटील (सर्व रा. आव्हाणे, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे हे करीत आहे