जळगाव मिरर / ३ एप्रिल २०२३
राज्यात गुन्हेगारीचे सातत्याने वाढ होत आहे. एका महिलेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. धक्कादायक म्हणजे महिलेने विरोध केल्याने तिला नग्न अवस्थेत झाडाला बांधण्यात आले. त्यानंतर अत्याचार करून डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. विमानतळाच्या भिंतीलगत असलेल्या मोतीवाला कॉलनीच्या जवळही घटना उघडकीस आली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. निता संतोष जोंधळे (वय-32 वर्षे) असे महिलेचं नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील चिखलठाणा विमानतळ परिसरात राहणाऱ्या निता संतोष जोंधळे या लघुशंकेसाठी गेल्या होत्या. दरम्यान लघुशंकेहुन परत येत असताना विमानतळाच्या भीतीलगत राहुल संजय जाधव (वय- १९ वर्षे ) प्रिंतम उर्फ सोनु महेंद्र नरवडे (वय २४), रवी रमेश गायकवाड (वय-३४ वर्षे) यांनी नीता यांना अडवलं. त्यानंतर त्यांना नग्न करून झाडाला बांधून अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे त्यानंतर महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान याबाबत महिलेच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, याबाबत पोलिसांना माहिती दिली.
विमानतळ परिसरात महिलेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलीसांनी, विविध तपास पथके तयार करुन आरोपींच्या शोध घेण्यासाठी रवाना केली. त्यानंतर राहुल संजय जाधव , प्रिंतम उर्फ सोनु महेंद्र नरवडे, रवी रमेश गायकवाड या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.