जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला ट्रकने जोरदार धडक दिली होती. या अपघातात पवन गोपाळ सुर्यवंशी (वय १६, रा. वसंतवाडी, ता. जळगाव) हा तरुण ठार झाला. ही घटना दि. २ रोजी वावळदा ते जळके रोडवर घडली. याप्रकरणी धडक देणाऱ्या ट्रक चालक अरशिद सनपसत्तार खान (वय ४५, रा. रोपडाक, ता. हथीन, जि. पलवल, हरियाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोळा असल्याने बैलांना सजविण्यास साज घेण्यासाठी गेलेल्या पवन गोपाळ सुर्यवंशी (वय १६, रा. वसंतवाडी, ता. जळगाव) हा (एमएच १९, बीडबल्यू ७५३१) क्रमांकाच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या (एचआर ७३, ९३१६) क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात पवन सुर्यवंशी हा ठार झाला असूर त्याच्यासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, बाळू पांडूरंग नेरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रक चालक अरशिद सनपसत्तार खान (वय ४५, रा. रोपडाक, ता. हथीन, जि. पलवल, हरियाणा) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे.