जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३
निःपक्षपाती निर्णयासाठी तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला असल्याचं प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी केलं. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव अंतर्गत जळगांव जिल्हा क्रीडा परिषद द्वारा आयोजित नाशिक विभागस्तरीय आंतरशालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा १७ व १८ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरली जाणारी अत्याधुनिक प्रणाली विभाग स्तरावर स्पर्धकांना खेळताना अनुभवता यावी यासाठी या स्पर्धा सेन्सर प्रणालीचा वापर करून घेण्यात आल्या. या स्पर्धेत धुळे, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगांव जिल्ह्यांमधील खेळाडू विभाग स्तरावर सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन साॅफ्टबाॅल चे आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री किशोर चौधरी यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी धुळे जिल्ह्याचे सचिव श्री हेमंत कुलकर्णी, नंदुरबार चे जावेद बागवान, अजित घारगे राज्य संघटनेचे सदस्य तथा सचिव जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन, श्री राजेन्द्र जंजाळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
तायक्वांदो हा खेळ दिवसेंदिवस अधिक प्रगत होत असून जागतिक स्पर्धांमध्ये होणारे बदल लक्षात घेत इथल्या खेळाडूंना त्या तत्रांची ओळख व्हावी, सवय व्हावी तसचं या खेळात आपल्या देशातील मुलं अधिकाधिक पुढे जावीत यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती राज्य संघटना सदस्य तथा सचिव अजित घारगे यांनी दिली. सेन्सर प्रणालीचा वापर यापुढे सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी जयेश बाविस्कर, निकेतन खोडके, श्रैयागं खेकारे, स्नेहल अट्रावलकर, कोमल कानावडे ( नाशिक ), निशिगंधा शहा ( नाशिक ), रोशनी जाधव ( नाशिक), पुष्पक महाजन, हिमांशू महाजन, यश जाधव, विष्णू झाल्टे, सुनील मोरे, हरीभाऊ राऊत, श्रीकृष्ण चौधरी, जिवन महाजन, जयेश कासार, महेश घारगे, श्रीकृष्ण देवतवाल, सारीपुत घेटे, शुभम कुंवर, आ ओम सहाने, प्रेरणा जगताप, यांचं सहकार्य लाभले.