अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची मौल्यवान वस्तू असलेली पर्स जळगाव येथील भाविकाला सापडली. मनात कोणतेही लालसा न ठेवता प्रामाणिकपणे पर्स आणून दिल्याने त्या भाविकाचे कौतुक कऱण्यात येत आले.
अभिषेक, पूजा व दर्शनासाठी येथील श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मंगळवारी अमळनेर येथील महिला भाविक सुवर्णा पाटील यांची पर्स मंदिर परिसरात हरविली. या पर्समध्ये बँकेचे एटीएम, घराच्या किल्ल्या, काही मौल्यवान दागिने व महत्वाची कागदपत्रे होते. पर्स हरविल्याबाबत सुवर्णा पाटील यांच्या लक्षात येताच. त्या खूप घाबरल्या. सदर पर्स बेवारस पडल्याचे जळगाव येथील रामचंद्र पोतदार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ मंदिराच्या चौकशी कक्षाशी संपर्क साधून सदर पर्स मंदिर प्रसासनाकडे सोपवली. पर्स हरविल्याबाबत आवाहन करण्यात आल्यानंतर सुवर्णा पाटील रामचंद्र पोतदार यांच्या हस्ते पर्स सोपविण्यात आली.
सौ. पाटील यांना पर्स परत मिळाल्याने मंदिर प्रशासन व रामचंद्र पोतदार यांचे आभार मानले. पोतदार यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे भाविकांनी कौतुक केले.