जळगाव मिरर | २४ डिसेंबर
शाळेत सोबत असल्याने परिचय असलेल्या एका तरुणीने लग्नास नकार दिल्याने एका २१ वर्षीय तरुणाने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.२२ डिसेंबर रोजी जळगाव शहरातील इच्छापूर्ती गणेश मंदिराबाहेर घडली. जळगाव तालुक्यातील एका गावात तरुणी वास्तव्यास असून कंडारी गावातील २१ वर्षीय तरुणाची तरुणीसोबत शाळेत सोबत शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये ओळखी असून त्यांच्यामध्ये परिचय देखील होता. दि. २२ डिसेंबर रोजी शहरात आलेली असताना तेथे हा तरुण आला व त्याने तू माझ्याशी लग्न कर, असे सांगितले. तरुणीने त्यास नकार दिला असता तरुणाने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २१ वर्षीय तरुणाच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र सुरवाडे करीत आहेत.