
जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२४
भुसावळ शहरातील तापी नदी पुलाची सुसाईड पॉईंट म्हणून ओळख झाली आहे. चोपडा येथील एका युवकाने आत्महत्या केल्याचे बुधवारी समोर आले. त्यामुळे आता या पुलावर जाळी बसवण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील पुलावरून तापी नदीत उडी घेत चोपडा येथील सम्राट नारायण नेटके (वय ३५, रा. चोपडा) यांनी आत्महत्या केल्याचे बुधवारी रात्री समोर आले. तापी नदीच्या पुलावरून एका पुरुषाने आत्महत्या केल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून इतरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेला. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चोपडा येथील सुरेश नेटके हे त्याचा पुतण्या सम्राट मंगळवारपासून बेपत्ता झाल्याने शोध घेत येथे आले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात जाऊन माहिती घेतली असता तापी पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या प्रौढाची ओळख पटली.