जळगाव मिरर । २३ जानेवारी २०२३ ।
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी किरण खंडू माळी (३०) याने पहूर येथील ख्वाजानगर परिसराच्या शेतातील खळ्यात रविवारी सकाळी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजानगर भागातील परिसरात असलेल्या अमोल देवीदास कुमावत यांच्या शेतात किरण खंडू माळी याने खळ्यात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना अमोल कुमावत यांच्या निदर्शनास सकाळी सात वाजता आले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक एस.पी.बनसोड, पोलीस कर्मचारी विनोद पाटील यांनी पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. अमोल कुमावत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तपास पोलिस कर्मचारी भरत लिंगायत व रवींद्र देशमुख करीत आहेत.
घरातील एकुलता एक कर्ता किरण
किरण माळी हा विवाहित तरुण असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवितात. घरचा एकुलता एक कर्ता मुलगा होता. त्याच्या पश्चात पत्नी आई व दीड वर्षांची मुलगी आहे. विशेष म्हणजे घरची परिस्थिती हलाखीची असून भूमिहीन परिवार आहे. त्यामुळे परिवार उघड्यावर आला आहे.