बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील एका २४ वर्षीय तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील भानखेडा येथिल भारती योगेश उगले (वय २४) हिने ओढणीने गळफास घेत आपल्या राहत्या घरात जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. या तरुणीचे सासर नांदुरा तालुक्यातील आडोळ होते. एका वर्षापुर्वी तिचा पती योगेश याचे मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्याजवळ अपघातात निधन झाले होते. तेव्हा पासुन तरुणी माहेरी भानखेडा येथे वास्तवास होती. आई जिल्हा परिषद शाळेत खाऊ बनविण्याचे काम करते ती शाळेत खाऊ बनवायला गेली असता. आपल्या चार वर्षीय लहान मुलगी देखत स्वतःच्या ओढणीनेच गळफास घेत भारतीने आत्महत्या केल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.